Sunday, February 27, 2011


ते स्वच्छ तुझे डोळे
मांडता शब्द थोडे
उमजून न कळल्यासारखे
माझे वेगळेच बोलणे

ते स्वच्छ तुझे मन
सांडता जादूचे कण
गुरफटलेल्या संध्याकाळी
सोडवून घेते काही क्षण

ते स्वच्छ तुझे सांगणे
ना वळणे ना कोडी
उत्तरात मात्र माझ्या
बहु फाटे दिशा थोडी

2 comments:

 1. किती सुंदर गं...

  ते स्वच्छ तुझे मन
  सांडता जादूचे कण
  गुरफटलेल्या संध्याकाळी
  सोडवून घेते काही क्षण....
  बढिया..!!!

  ReplyDelete