Saturday, February 5, 2011

न कळणारा भास असा की
अस्तित्व रेषा रेखत राहतो

मी शोधतो ऎकतो पाहतो सारे
तरी अन्वयार्थ का लागत नाही.

डोळ्यांत तुझ्या रंग असे  की
मुक्त नाचणारे  मोर कैक 

त्या मुग्धतेत हरवून जातो
अबोध भाषा काही समजत नाही.

तुझे बोलणे लाजवट असे  की    
गंधाळून चाफ्याचे झाड डोलले      

त्या परिमळात डुंबत रहातो    
बोललो काय नंतर आठवत नाही.

4 comments:

 1. agg ,kiti chhan lihiles..mastttttch..

  ReplyDelete
 2. माऊताई, तुझी दाद कॅलिग्राफी मधून केव्हाच मिळाली.. :)
  धन्यवाद म्हटले तर रागावशील, पण खरंच थॅंक्स!

  ReplyDelete
 3. Hello Minal..
  khupach chaan..masttt...lajvab...
  atishay sundar...kya khoob...asa lihilay...
  zakaas ekdum...aavadala mala...thnx..!!!!

  ReplyDelete
 4. परिचित,
  प्रत्येक शब्दासाठी थॅंक्स! :)

  ReplyDelete