Sunday, February 27, 2011


ते स्वच्छ तुझे डोळे
मांडता शब्द थोडे
उमजून न कळल्यासारखे
माझे वेगळेच बोलणे

ते स्वच्छ तुझे मन
सांडता जादूचे कण
गुरफटलेल्या संध्याकाळी
सोडवून घेते काही क्षण

ते स्वच्छ तुझे सांगणे
ना वळणे ना कोडी
उत्तरात मात्र माझ्या
बहु फाटे दिशा थोडी

Friday, February 11, 2011

सये तुझ्या अंगणातील
चुकार काही ओले क्षण
भरकटून आलेत इथे
झाडाशी अन दाराशी थोडे

परतीचे मार्ग त्यांना
समजत कसे नाहीत
आभाळापलीकडे आभाळ नाही
दहा सोडून दिशा नाहीत

मखमलीची तुझी भूल
प्राजक्ताचे तुझे भास
हे कणभर कारण पुरते
परि सत्य पाहता काय उरते?

Saturday, February 5, 2011

न कळणारा भास असा की
अस्तित्व रेषा रेखत राहतो

मी शोधतो ऎकतो पाहतो सारे
तरी अन्वयार्थ का लागत नाही.

डोळ्यांत तुझ्या रंग असे  की
मुक्त नाचणारे  मोर कैक 

त्या मुग्धतेत हरवून जातो
अबोध भाषा काही समजत नाही.

तुझे बोलणे लाजवट असे  की    
गंधाळून चाफ्याचे झाड डोलले      

त्या परिमळात डुंबत रहातो    
बोललो काय नंतर आठवत नाही.