Thursday, December 16, 2010

पडून गेल्या पावसाचा
गंध वेगळा आहे
अवेळी फुलल्या स्मितरेषांचा
खेळ आगळा आहे

आठवणअक्षर पुन्हा गिरविण्याचा
छंद भाबडा आहे
कुणा मनविभोर अस्तित्वाचा
भास तेवढा आहे

कधी ढगाळ करडा
कधी मधाळ भुरका
बहुदा दुसर्‍या मनाचा
रंग आठवा आहे

2 comments: