Sunday, November 7, 2010कचकड्याचे दिवस परतू पाहताना

वाटेतच त्यांना जाणवलं,

की आता पायाखाली मखमल नाही,

तेव्हा चक्क यायला नकार दिला त्यांनी!

निरागस निरागस म्हणून लाडावून

ठेवलेले कचकड्यांचे दिवस..

हिरवा हा एकच रंग होता तेव्हा,

पोपटी, मेंदी अशा पोटशाखा कळायच्याच नाहीत..

पाऊसगप्पा मारताना जुनी आठवण काढायचा प्रश्नच नव्हता,

जे होतं, ते सगळं नविनच होतं..

आपल्याला फारसं कळत नाही हे अमान्य करण्याचा

खटाटोप करण्याची गरज नसलेले दिवस,

रंगवून सांगितलेल्या गोष्टींतले मोर

आत्ता उडी मारुन बाहेर येतात की काय असं वाटायला लावणारे दिवस..

तुझ्या डोळ्यांच्या नाचणार्‍या मनभावल्या

काळेभिन्न पाणी गोठवून ठेवल्यासारख्या..

आपल्यातुपल्यातली गोष्ट नक्की उघड करणार नाहीत ना?

तुला त्याच हक्काने दटावायचं ठरवलं तरी

तसं करता येणार नाही गं..

कचकड्यांच्या दिवसांनी खडबडीत रस्त्यांवरुन यायला

चक्क नकार दिलाय..!

6 comments:

 1. सुरेख..हरेक शब्द आठवणीत घेऊन जातोय..thanks

  ReplyDelete
 2. खरंच सुरेख.. आवडलं

  ReplyDelete
 3. श्याऽ याऽऽऽर मी इतके दिवस हा ब्लॉग का वाचला नाही???

  आत हात घालून स्पर्ष करण्याची आणि नव्याने विचार करायला लावायची ताकद आहे यात.

  जाम आवडलंय.

  अजून येऊ दे, अजुन येऊ दे!

  :-)

  ReplyDelete
 4. सौरभ,

  आडवळणाचा ब्लॉग आहे, कसा दिसेल? :D
  तुझ्या कमेंटने आणखी मूठभर मांस चढलं. त्यामुळे काहीबाही येत राहिलच!

  खूप खूप आभार.. :)

  ReplyDelete