Tuesday, November 23, 2010

निंदसे घिरे नैना कबसे शिकायत कर रहे है इतने उजाले की,
हात बढा़कर बंद भी नही कर सकता ये रोशनी

बड़ी तेज जल रही है आज ये चाँद की बत्ती!

Monday, November 15, 2010

छोटे थे, माँ उपले थापा करती थी

हम उपलों पर शक्लें गूँधा करते थे

आँख लगाकर, कान बनाकर

नाक सजाकर -

पगड़ी वाला, टोपी वाला

मेरा उपला -

तेरा उपला -

अपने-अपने जाने-पहचाने नामों से

उपले थापा करते थे

हँसता-खेलता सूरज रोज़ सवेरे आकर

गोबर के उपलों पे खेला करता था

रात को आँगन में जब चूल्हा जलता था

हम सारे चूल्हा घेर के बैठे रहते थे

किस उपले की बारी आयी

किसका उपला राख हुआ

वो पंडित था -

इक मुन्ना था -

इक दशरथ था -

बरसों बाद - मैं

श्मशान में बैठा सोच रहा हूँ

आज की रात इस वक्त के जलते चूल्हे में

इक दोस्त का उपला और गया!


-गुलजार (पुखराज)
--------------------------------------------------

एक यात्रा जेव्हा संपते तेव्हा दुसरी सुरु होते का? होत असेलही कदाचित, नसेलही कदाचित! लहानपणी कधीतरी खेळलेल्या गोवरींचा खेळ पुन्हा कधी आठवला गेला असेल? गाव सोडताना? कुठल्याशा कॅंपमधे जुनाट रात्री धगधगलेल्या आगीभोवती गोल करुन बसल्यावर पिवळ्या रंगात बुडून जाताना, की थेट आत्ताच? अगदीच नाही म्हटले तरी, मधेच कधी चुकार आठवण डोकावली असेलच जशी आत्ता आठवली. ही तुझी गोवरी, ही नाकवाली माझी..  कित्ती वर्षे झाली त्याला, आता ती चूल विझून गेली आहे, आणि इथे दुसरी पेटू लागली आहे.
एक महायात्रा संपते तेव्हा बाकी दुसरी यात्रा सुरु होते. हो, होतेच!

Sunday, November 7, 2010कचकड्याचे दिवस परतू पाहताना

वाटेतच त्यांना जाणवलं,

की आता पायाखाली मखमल नाही,

तेव्हा चक्क यायला नकार दिला त्यांनी!

निरागस निरागस म्हणून लाडावून

ठेवलेले कचकड्यांचे दिवस..

हिरवा हा एकच रंग होता तेव्हा,

पोपटी, मेंदी अशा पोटशाखा कळायच्याच नाहीत..

पाऊसगप्पा मारताना जुनी आठवण काढायचा प्रश्नच नव्हता,

जे होतं, ते सगळं नविनच होतं..

आपल्याला फारसं कळत नाही हे अमान्य करण्याचा

खटाटोप करण्याची गरज नसलेले दिवस,

रंगवून सांगितलेल्या गोष्टींतले मोर

आत्ता उडी मारुन बाहेर येतात की काय असं वाटायला लावणारे दिवस..

तुझ्या डोळ्यांच्या नाचणार्‍या मनभावल्या

काळेभिन्न पाणी गोठवून ठेवल्यासारख्या..

आपल्यातुपल्यातली गोष्ट नक्की उघड करणार नाहीत ना?

तुला त्याच हक्काने दटावायचं ठरवलं तरी

तसं करता येणार नाही गं..

कचकड्यांच्या दिवसांनी खडबडीत रस्त्यांवरुन यायला

चक्क नकार दिलाय..!