Thursday, September 2, 2010

बराच वेळ उलटून गेलाय, खरं म्हणजे आता पुस्तक वाचण बंद करायला हवं, पण पुढे काय होईल याची उत्सुकता  स्वस्थ बसू न देणारं पुस्तक! तारवटलेल्या डोळ्यांनी तशीच पानं खायला सुरु!
एंजल्स ऍन्ड डिमन्स, डा विंची.. हा डॅन ब्राऊन अफलातून माणूस आहे. कमालीची वेगवान पुस्तके लिहतो. इतकी, की हे असं असू शकेल का हा विचार करायला वेळच देत नाही..
त्याचे मूळचे सगळे संदर्भ खरे असल्याने ख्रिश्चन प्रोटोकॉल, काही पध्दतींविषयीचा भयंकर गोंधळ थोडा कमी झाला.  येशूची ब्लडलाईन अस्तित्वात आहे की नाही कुणास ठाऊक, इल्युमिनाटी कितपत पाशवी होती/ आहे ते डिमन्सच जाणो, एकूण मजा आली.. आता द लॉस्ट सिंबॉल आणि डिसेप्शन पॉईंट.
बघू, ब्राऊन कारखान्यातून आणखी काय काय निघत ते!

6 comments:

 1. विचार करायला वेळच देत नाही..

  very true!

  ReplyDelete
 2. Thank you Yogesh,
  yes, he is a witty writer!

  ReplyDelete
 3. एंजल्स ऍन्ड डिमन्सवाचलं नाहीये.. चित्रपट बेफाट आहे. विंची कोड चित्रपट आणि पुस्तक दोन्ही जाम भारी आहे.. लास्ट सिंबल जाआआआआआम भारी आहे पण शेवट अगदीच फुसका.. केवळ अपेक्षाभंग.. पण तरीही पुस्तकवाचनाचा आनंद अप्रतिम... सध्या डिसेप्शन पॉईंट वाचतोय.. तीच टिपिकल स्टाईल.. प्रचंड फास्ट घडामोडी.. काहीच सुचू देत नाही पठ्ठ्या.. डिसेप्शन पॉईंट संपलं की माझं मत इथे अपडेट करतो.. :)

  ReplyDelete
 4. हेरंब,
  एंजल्स वाचूनही बघ! चित्रपटात काही गोष्टी गाळल्या आहेत.
  लास्ट सिंबल वाचायच आहे अजून..
  डिसेप्शन पॉईंटच मत नक्की अपडेट कर.
  रच्याक, तो इतक्या सगळ्या गोष्टींचा मूळ कथेशी कसा संबंध जोडत असेल रे? :)

  ReplyDelete
 5. अवघड आहे, किती वाचू आणि वेळ कसा काढू :(

  ReplyDelete
 6. सुट्टीच्या दिवशी!

  ReplyDelete