Thursday, September 2, 2010

बराच वेळ उलटून गेलाय, खरं म्हणजे आता पुस्तक वाचण बंद करायला हवं, पण पुढे काय होईल याची उत्सुकता  स्वस्थ बसू न देणारं पुस्तक! तारवटलेल्या डोळ्यांनी तशीच पानं खायला सुरु!
एंजल्स ऍन्ड डिमन्स, डा विंची.. हा डॅन ब्राऊन अफलातून माणूस आहे. कमालीची वेगवान पुस्तके लिहतो. इतकी, की हे असं असू शकेल का हा विचार करायला वेळच देत नाही..
त्याचे मूळचे सगळे संदर्भ खरे असल्याने ख्रिश्चन प्रोटोकॉल, काही पध्दतींविषयीचा भयंकर गोंधळ थोडा कमी झाला.  येशूची ब्लडलाईन अस्तित्वात आहे की नाही कुणास ठाऊक, इल्युमिनाटी कितपत पाशवी होती/ आहे ते डिमन्सच जाणो, एकूण मजा आली.. आता द लॉस्ट सिंबॉल आणि डिसेप्शन पॉईंट.
बघू, ब्राऊन कारखान्यातून आणखी काय काय निघत ते!