Friday, April 16, 2010
पाऊसभरले मन घेई अदृष्टाचा ठाव
काचपांढर्‍या सरींची जमिनीवर धाव

झाड चिंब पाखरुही चिंब
चिंब रुसकी पायवाट
खळाळत पुढती झाले
चिमणे ओहोळ भुरकट

रंग विभोर दाटला वर
आभाळ फिरते गार
गुंतलेली फांदी हलली
शेंड्याकडे तुरतुरली खार

वारा पानांचा खेळ चाले
दुसरा नाही आवाज
चहुकडे गजबजे गच्च
तो एकच पाऊसनाद

जळ इथे तिथेही जळ
उलगडेल हिरवी चादर
झुळझुळताना दिसत आहे
पाण्यात पाण्याचा पदर

4 comments: