Saturday, December 26, 2009

आज मनात गढूळ आभाळ उतरलयं..
नसलेल्याचा शोध घेतल्यासारखं,
असलेल्याचा विसर पडल्यासारखं
अगदी भरकटलेल्या वारुसारखं!
जमिन आकाशामधल अंतर विसरुन
आज मनात गढूळ आभाळ उतरलयं..!

Tuesday, December 8, 2009

रंग

तुम्हारा पसंदिता रंग कौनसा है?


शामकी पार्टी मे एक दोस्तने युँही पूछा,

ताजा शहदमे हल्का पिला गुड मिलाओ

और उस घुले रंग को कच्ची धूपमे ले जाओ

हाँ, वही चमकता भूरा मेरा पसंदिता रंग है ।

पच्चीस सालोंकी परत उस मीठी नजरकी याँद मिटा नही पाई,

उसी पार्टीमें मैने देखा था तुमको,

किसीने कहा भी, तुम्हारा कॅटरॅक्ट का ऑपरेशन हुआ है

अच्छा है, ऑपरेशन करनेसे आँखोंका रंग थोडेही बदलता है?

Monday, November 23, 2009

ग्रे

दोन आठवडे झाले, त्रिवेणी नक्की मागवतो म्हणून मेहता बुक सेलर्सने सांगितले होते. ही तिसरी खेप. का आणत नाहीये तो?  खरचं Shortage असेल का?  मग शि.द. फ़डणीसांच पुस्तकही मिळत नाहीये म्हणाला. आणि ’ महाभारतील व्यक्तीरेखा’ पुस्तकाविषयी विचारले तर चक्क नाक उडवून हसला मेला!
नोव्हेंबरमधे पाऊस? छ्या, मोठ्या मुश्कीलीने सकाळी फ़िरायला जायचं कोष्टक बसवल होत. आता परत ओमsफ़स!! ते फ़िरायचे बर्‍याच दमड्या मोजून घेतलेले बूट तब्बल एक वर्षांनी काढले तेव्हा, घरच्यांनी चेष्टा करण्यात जाम हात धुवून घेतले होते. आता परत ते सगळी वाक्‌सुमने ऎकावी लागणार!
घरी सुट्टीचे दीड दोन दिवस कसे पट्कन जातात. मग ऑफ़िसमध्ये दिवस आजकाल ढकलावा का लागतो?  जाड्या Desktop कॉंप्युटर कडे बघायचाही वैताग येतो, मग नाविन्यपूर्ण वगैरे काम तर दूरच!
कधीनव्हे तो थिएटरला पिक्चर पाहिला तो पण All the Best ! ह्याची शिफ़ारस करणार्‍याला धरुन गदागदा हलवावे, तर तो परदेशात! हॅरी पॉटर-६ मिस झाल्याचे शल्य काही भरुन निघाले नाही.
या सारेगमचा एक कंटाळा आलाय. परिक्षकांचे आणि माझे गुणही मिळत नाहीयेत.
आईने माझ्याच तुंबलेल्या कामांची ही मोठी माळ टाकली. एकही अजून पूर्ण नाहीये. वर आणि माझं राशीभविष्यही चांगल छापून येत नाहिये.
आणि  हा काय तक्रारनामा लिहलाय पाच मिनिटातं? छ्या बुवा..!

Tuesday, October 27, 2009

Triveni

जुन्या कपाटातला शेवटचा कप्पा
धूळ साफ़ करायला हवी..

नकोच, वरचे सगळे कप्पे गढूळ होतील त्याच काय?


Old cupboard
last shelf
Should be untouched!